तालुका प्रतिनिधी
सिध्दार्थ कदम
महागाव: नालंदा बौध्द विहार, गुंज येथे 68व्या महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गावकऱ्यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जयशील कांबळे, सरपंच पुष्पाताई पंडीत कांबळे, माजी सरपंच शंकरराव कांबळे, सुभाष खंदारे, प्रल्हाद नवसागरे, आकाश गायकवाड, संतोष कांबळे, मोरे साहेब, ताराबाई मानकर, सखूबाई कांबळे, स्वातीताई चवरे, रविता लहाणे व इतरही गावकरी मंडळी उपस्थित होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्यांचे अनुयायीचं पुढे चालवू शकतात; म्हणून बाबासाहेबांचे भक्त न बनता अनुयायी बना,असे मत जयशील कांबळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतूजा इंदूरकर यांनी केले.



