विभाग प्रतिनीधी: – हिंगणघाट
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणघाट विधानसभेच्या झालेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली. सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून राज्य उपाध्यक्ष किशोर भाऊ सराईकर व जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ पोटफोडे यांनी नियुक्तीपत्र देऊन हिंगणघाट मतदान क्षेत्रातील पद नियुक्ती करण्यात आली.त्यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष जयंता कातरकर तालुका अध्यक्ष हिंगणघाट, पवन तडस तालुका संघटक ,देवा काटकर तालुका सचिव, सुधीर बोरीले तालुका उपाध्यक्ष ,सुरज भोसले ,हिंगणघाट शहर अध्यक्षपदी केतन तायवाडे, स्वप्निल दाते शहर संघटक, योगेश नासरे शहर सचिव ,रमेश राऊत शहर उपाध्यक्ष, कामेश बावणे शहर उपाध्यक्ष तसेच समुद्रपूर तालुका अध्यक्ष पदी विठ्ठल तळवेकर, तालुका संघटक हरिभाऊ महाजन, तालुका सचिव संजय हिंगणे ,तालुका उपाध्यक्ष राजूभाऊ पाऊण ,फासे समुद्रपूर शहराध्यक्ष वैभव बोरकुटे ,गणवीर सर्कल अध्यक्ष गिरड मनोर राव ,समुलकर सर्कल अध्यक्ष जाम मंगेश दोडके, तालुका उपाध्यक्ष निखिल वरघने ,कोरा सर्कल अध्यक्ष सागर घवघवे, सावली सर्कल अध्यक्ष इत्यादी कार्यकर्त्यांना पदभार देण्यात आला आहे त्यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष जयंता कातरकर यांनी माननीय राज साहेब ठाकरे राज्य उपाध्यक्ष किशोर भाऊ सराईकर जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ पोटफोडे यांचे आभार मानले व सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन वाढवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन बैठकीची सांगता करण्यात आली.


