मराठवाडा विभाग प्रमुख :- शुभम उत्तरवार
लोहा -पंचायत समिती लोहा प्र. शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख सुनेगाव बाबुराव फसमले आपल्या प्रदीर्घ सेवेतून येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्य त्यांच्या सेवापूर्ती गौरव सत्कार सोहळा निमित्त आज२८ जून रोजी दु.१:०५ वा. विकी गार्डन मंगल कार्यालय पारडी. तालुका लोहा येथे आयोजित केला आहे.
तरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर तर कार्यक्रमाचे उद्घाटक खा.अजित गोपछडे, प्रमुख अतिथी म्हणुन आ. तुषार राठोड, राज्यनेते म.रा.प्रा. शिक्षक संघ संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष म.रा.प्रा.शिक्षक संघ बाळासाहेब मारणे,मा. आ.ईश्वरराव भोसीकर मा.आ.शंकरअण्णा धोंडगे उपायुक्त आयकर विभाग पुणे प्रसाद मेनकुदळे,अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव,पुर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे ,उपजिल्हाधिकारी पुणे सुप्रिया डांगे (मेनकुदळे),मुख्य लेखा व वित्तधिकारी, जि.प. पालघर धनराज पांडे, , शिक्षणाधिकारी (प्रा.) वंदना फुटाणे,कंधार गटविकासअधिकारी महेश पाटील,गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे,जीवनराव वडजे ,देविदास बस्वदे , मधुकरराव उन्हाळे जी. एस. मंगनाळे आदीच्या उपस्थितील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रप्रमुख गोलेगाव, केंद्रप्रमुख कन्या, लोहा केंद्र-सुनेगाव, केंद्र-कन्या लोहा, केंद्र-गोलेगाव अंतर्गत जि.प. व खाजगी शाळा सर्व मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिका उपस्थित राहणार आहेत.


