शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास गोरसेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडू.
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील खंडाळा बीट अंतर्गत येणाऱ्या जमशेटपूर या गावातील एकूण 80 शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांच्या पासून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची नुकसान होती व नुकसान भरपाई देण्यात यावी करीत जमशेटपूर या गावातील शेतकऱ्यांनी 2024 मध्ये वनभवन येथे अर्ज सादर केले होते पण झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही यावर तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.

सदर प्रकरणातील जे अधिकारी आहे ज्यांनी शेतकऱ्याची दिशाभूल केली त्या अधिकारी विरुद्ध कारवाई करण्यात यावी तसेच शेतकऱ्याचे वन्य प्राण्यापासून झालेल्या नुकसान भरपाई हे 15 दिवसाच्या आत तात्काळ देण्यात यावा अन्यथा गोरसेना या स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल त्यास होणाऱ्यास परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील आसे निवेदन वन भवन पुसद येथे देण्यात आले.

