बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
मेहकर लोणार रस्त्यावरील वडगाव तेजन जवळ चार चाकी वाहनाने ५ पलट्या घेतल्या.. या भीषण अपघातात १ जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले. मृतक आणि जखमी चौघेही लोणारचे आहेत.. ते मेहकर वरून लोणार कडे जात होते.
भाजपा शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्यासह तिघे जखमी असून त्यांच्यावर मेहकर येथे उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार एम एच २८, बी. डब्ल्यू ०९५९ क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या चार चाकी वाहनाने चौघे मित्र मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहकर वरून लोणार कडे जात होते. काल दिवसभर मेहकर लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.व डगाव तेजन जवळ शेतातील माती खं रडून मुख्य रस्त्यावर आलेली होती.. त्या मातीवर चार चाकी वाहन स्लीप झाले, गाडीने चार ते पाच वेळा पलट्या मारल्या..या अपघातात ऋषभ बाबुलालजी बगडिया याचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. जखमी व मृतकांना तातडीने मेहकर येथे हलवण्यात आले.. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता
दरम्यान एवढा मोठा वर्दळीचा रस्ता असताना आणि काल रात्री एवढा भीषण अपघात झालेला असताना देखील रस्त्यावरच चिखल यंत्रणे कडून अद्याप हटवलेला नाही. यामुळे आणखी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही

