.खा.डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती या निमित्ताने सौ.गिताताईचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन….
दिं.२७ जून २०२५
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने “सन्मान कार्याचा, गौरव महाराष्ट्राचा” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त सौ. गीताताई सुशिल हिंगे (महिला मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्षा) यांचा भव्य सत्कार सोहळा शासकीय विश्रामगृह,( सर्किट हाऊस) कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या भव्य कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते प्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मनोगतात त्यांनी सौ. गीता हिंगे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करताना म्हटले की, “सामाजिक परिवर्तन आणि सेवा हेच त्यांचे खरे शस्त्र आहे. त्यांचे कार्य समाजहिताचे असून, अशा व्यक्तीमुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला खंबीर बळ मिळते. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
या निमिताने मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन सौ. गीता हिंगे यांचा सन्मान करत त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,डॉ. चंदाताई कोडवते, तालुका अध्यक्षा रोशनी वरघंटे,माजी सभापती रंजिता कोडाप, जिल्हा सचिव सौ. वर्षाताई शेडमाके,प्रिती शंभरकर, माजी नगरसेविका अल्का पोहनकर, पल्लवी बारापात्रे,रुपाली कावळे,सिमा कन्नमवार यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या अनेक पदाधिकारी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सौ. गीता हिंगे यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यातून अनेक महिलांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल. सत्कार सोहळ्याचा संपूर्ण वातावरण गौरवाने भारले होते.

