कंधार . ज्ञानेश्वर कागणे.
कंधार शहर व ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये सर्दी ताप, खोकला , थकवा अशी कोरोना सदृष्य लक्षणे दिसून येत असून आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.महाराष्ट्रात पूणे मुंबई यासारख्या शहरात कोराना रुग्णांची नोंद होत असून कांही रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्ध्या पावसाळ्याचे दिवस असून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे रुग्ण नियमीत उपचारांने रोगमुक्तही होत आहेत.परंतू याच लक्षणाची वाढ होऊन रुग्णसंख्या वाढत गेली तर कोराना सारख्या आजाराची साथ सुरु होऊ शकते.
यासाठी वेळीच आरोग्य विभागाने लक्ष देऊन कांही रुग्णांच्या तपासण्या करणे गरजेचे आहे. जेणेकरून जनतेच्या मनातील भितीही दूर होईल आणि जर एखादा रुग्ण सापडला तर वेळीच खबरदारी घेऊन योग्य उपचार करणेही सोयीचे होईल. पण सध्या आरोग्य विभाग याकडे साफ दुर्लक्ष करत असून भविष्यात कोरानाचे संकट नाकारता येणार नाही.येथील ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता तेथील डॉक्टरांनी रुग्ण वाढल्याची माहीती दिली परंतू प्रशासनाकडून आम्हाला कोणत्याही सूचना नसल्याचे सांगण्यात आले. येथील वेदयकीय अधिक्षकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता ते सतत नांदेडला राहत असल्याची माहीती मिळाली त्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

