प्रतिनिधी:- सगीर शेख खर्डी
शहापूर तालुक्यातील परिसरातील गेल्या दोन महिन्यां पासून ठिकठिकाणी गहाळ झालेले 16 मोबाईल शहापूर किन्हवली व वासिंद पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून शोधून काढले निरीक्षक मुकेश ढगे किनव्हलीचे सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली ते मोबाईल मूळ मालकांकडे 15 जूनला शहापूर येथील कुणबी समाज सभागृहात सुपूर्द करण्यात आले
यावेळी तांत्रिक तपास करून मोबाईल शोधून काढणान्या पोलीस अंमलदार भाऊसाहेब मुंडे यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली महाराष्ट्र पोलिसांच्या सीआय अर पोर्टलवर शहापूर तालुक्यातील अनेक ठिकाणची मोबाईल गाहाळ झाल्याची तक्रार दाखल होती या गाहाळ झालेल्या मोबाईल शोध घेण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून पोलीस अंमलदार बी एन मुंडे यांनी मागील दोन महिन्यातील 16 मोबाईल शोधून काढले होते पोलिसांना मिळून आलेल्या मोबाईलचे मूळ मालकांना कागदपत्रांची तपासणी करून सुपूर्द करण्यात आले
शहापूरच्या पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे

