शेगाव पंढरपूर रोड लगतच्या सुलतानपूर तालुका लोणार येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट न लावल्यास जलसमाधी आंदोलन…
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनील वर्मा
नागवंशी संगपाल पनाड, यांचा प्रशासनाला इशारा
सुलतानपूर येथे शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरात शिरले पाणी ,
लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे 26 जून रोजी दुपारी 2 वाजता शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.
सुलतानपूर गावातून शेगाव पंढरपूर पालखी मार्ग गेलेला आहे पालखी मार्गाच्या दोन्ही साईडला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बांधकाम न केल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व धान्यासह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
याबाबत मेहकर – लोणार विधानसभा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य संघपाल पनाड यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करुन निवेदन दिले. यावेळी, युवा नेते अनित्य घेवंदे असिम भाई पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख अमीर भाई, संतोष शिंदे,दिपक राजगुरू , सद्दाम भाई,सुमन मारुती पनाड , सागर निर्मळे , सिमा संतोष पवार, सुनिता ज्ञानेश्वर हरकाळ, जाकीर खा शौकत खा पठाण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



