राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव:-तालुक्यातील राळेगाव येवती रोडवर वनोजा गावाजवळील पुलाचे बांधकाम गेल्या दोन महिन्यापासून चालू आहे,तरी बाह्यवळण रस्ता रात्री च्या पाण्यामुळे पूर्ण पुल हा वाहून गेला आहे तरी वनोजा,धानोरा,रोहिणी,दापोरी,येवती, पार्डी,परसोडा,चहांद या सर्व गावांचा संपर्क तुटला असून शाळेकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शेतकर्याना तालुका पातळीवर कामांना फटका बसणार असून सर्व कामे रखडली आहेत.नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.लोकांना आवश्यक कामासाठी तालुका पातळीवर ये-जा करणे शक्य होत नाही.
जीवनावश्यक वस्तूंची सोय होण्यास अडचणी येत आहेत,आणि एखाद्या रुग्णाला तात्काळ तालुका पातळीवर जायचे असेल तर त्याला मरणाच्या दारात जाव लागेल तरी प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू करावे.नाल्याच्या पाण्याची योग्य वाट करून बाह्य वळण रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा,नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्या या सर्व गावाला जोडणारा हा परिसरातील हा एकमेव जास्त वर्दळीचा रस्ता आहे.ठेकेदाराच्या मनमानी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे,त्यामुळे कामात दिरंगाई न करता ठेकेदाराने लवकरात लवकर काम मार्गी लावावे.
अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आणि संबंधित बांधकाम विभागाने या पुलाचे काम लवकर करून लोकांना जाणण्यासाठी मार्ग खुला करून द्यावा अशी मागणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून आणि वनोजा ग्रामवासीयांकडून होतांना दिसून येत आहे.

