मराठवाडा विभाग प्रमुख (शुभम उत्तरवार)
हिंदू धर्मांत बारसे अर्थातच नामकरण सोहळा हा अतिशय महत्वाचा विधी मानला जातो.नवल असं की एखाद्या बाळाचे नामकरण अर्थात बारसे आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करतो परंतु लोह्यातील देऊळगल्लीतील गायीच्या अर्थातच गोमातेच्या वासराचे बारसे हा कार्यक्रम संबंध भारतीय संस्कृतीत आदर्शदायी उदाहरण ठरले.
गोमातेला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान असून गोमातेच्या वासराचे बारसे लोहा शहरातील देऊळगल्ली भागात भोस्कर दांपत्य वा कुटुंबीयांनी सोवळे धारण करून हिंदू धर्म पद्धतीने विशिष्ट मंत्रोच्चारात,विधिवत कलश पुजन,विविध रत्नजडीत अलंकार, नमूनेदार खवय्यांनी वा नैवेद्य अतिशय उत्कृष्ट रित्या मांडून ,मनोभावे पुजा अर्चा पाठ करून शुभ मुहूर्तावर विधीयुक्त मंत्रोच्चारात सदरील बारसे विधी कार्यक्रम दि. (२६) जून रोजी पार पडला.
गोमातेबद्दल आदरभाव असलेले भोस्कर कुटुंबीय यांनी सर्व समाजातील, धर्मातील महिला भगिनींनी, ज्येष्ठांना आमंत्रित करून गोमातेच्या बद्दल चा आदरभाव, सेवाभाव, आध्यात्मिक महत्व,तिचे रक्षण, गोमातेची फायदे यात गाईचे दुध, गोमूत्र,शेण या सर्व बाबींतून सात्विकतेचे, धार्मिकतेचे विशेष महत्त्व असल्याने जणू भारतीय संस्कृतीत प्रेरणादायी उदाहरण म्हणून अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने विविध गीतांचे गायन करून, पुजन करून तेहतीस कोटी देवांच्या दर्शनाचा फार महान योग या शुभमुहूर्तावर आला असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले.
विशेषतः गोमातेचे या नामकरण अथवा बारसे सोहळ्यातून भारतीय संस्कृतीत विशेषतः हिंदू धर्मात असलेल्या गोमातेस अनन्यसाधारण महत्त्व असून शहरातील आर्य वैश्य समाजातील भोस्कर कुटुंबीयांनी कुठे कधी न कुणी केलेला गोमाता बचाव देश बचाव चा जणू यातून एक नाराच दिली.
यावेळी उपस्थित सविता भोस्कर, लोहा नगरीचे मा. नगरसेविका गोदावरीताई सूर्यवंशी, सौभिकुताई रहाटकर , संगीता चन्नावार , भाग्यश्री रेखावार इंदुताई रहाटकर, सुनंदा रहाटकर, उमां राहटकर, संगीता चालिकवार , ज्योती आंबेकर, वैशाली भातलवंडे, पल्लवी बिडवई, बालीताई बंडेवार, शिल्पा बच्चेवार, लता किटे, सुनंदा बच्चेवार, ज्योती पेडगुलवार, आरती भोस्कर, प्रिया रुद्रवार, सुनीता रहाटकर, शोभा अमिलकंठवार, निर्मला काचावार, राधिका पाठरकर, आदींची उपस्थिती होती.


