विदर्भ विभाग प्रतिनिधी:- युसूफ पठाण
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर दर चार महिन्यांनंतर घेण्यात आलेल्या जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त बैठकीत वर्धा सोशल फोरम,वर्धा या सामाजिक संस्थेच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल राज्य प्रशिक्षण विभागाच्या सहकार्यवाह डॉ माधुरी झाडे यांचा राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या हस्ते व जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी मुरडीव वर्धा शहर शाखा अध्यक्ष अरूणभाऊ चवडे यांच्या उपस्थितीत पुस्तके भेट देऊन वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृह येथे सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 9 ऑगस्ट 1989 झाली तेव्हापासून गेली 35 वर्षे खंड न पडता राज्यातील विविध जिल्ह्यांत राज्य कार्यकारिणी आयोजित करून गेल्या चार महिन्यांत समितीच्या 23 विभागातील कार्यवाह, सहकार्यवाह यांनी काय काय उपक्रम, कार्यक्रम, मोहिमा केल्या पुढे चार महिन्यांत यादृष्टीने काय काय करणार आहे याचा लेखाजोखा मांडला जातो तर आर्थिक नियोजनाला सर्वांसमक्ष ठेवून मान्यता घेतली जाते यासोबतच 36 जिल्ह्यातील 365 च्या वर असलेल्या शाखांचा अहवाल घेतला जातो अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातात पुढील चार महिन्यांत राबविण्यात येणारे उपक्रम कार्यक्रम यावर चर्चा करून निर्णय घेतला जातो या सर्वांची माहिती शाखेतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना व्हावी त्यांनीही या प्रबोधनाच्या कार्यात हिरहिरीने सहभाग घ्यावा या हेतूने राज्य कार्यकारिणी झाली कि जिल्हा शाखेची बैठक घेण्यात येते वर्धा जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृह येथे आयोजित करण्यात आली.
यावेळी राज्य संशोधन विभागाचे सहकार्यवाह डॉ हरिश पेटकर यांनी शहादा येथे संपन्न झालेल्या राज्य कार्यकारिणीचा वृत्तान्त ठेवला यानंतर वर्धा जिल्ह्यातील आठही शाखांच्या संघटना बांधणी वर सखोल चर्चा होऊन यापुठे प्रत्येक शाखेला भेट देणे किमान ती शाखा क्रियाशील, उपक्रमशिल करणे,शहर शाखा हि लिड शाखा करणे,सर्व शाखांमध्ये पाक्षिक बैढका होण्यासाठी शाखा दत्तक घेणे येणा-या चार महिण्याण्यात येवू घातलेले उपक्रम कार्यक्रम कसे आयोजित करणे यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला तर वर्धा शहर शाखेची बैठक दर पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी सायंकाळी 7 वाजता बैढक आयोजित करणे आदी निर्णय घेण्यात आला
यावेळी राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी संघटनात्मक बांधणी वर सखोल मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली बैढकिचे प्रस्ताविक शहर शाखेच्या कार्याध्यक्ष कविता राठोड यांनी केले तर आभारप्रदर्शन वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे सहकार्यवाह दिलीप गुळघाणे यांनी केले यावेळी मोहन खैरकार, गुड्डू देशमुख, व्दारकाताई ईमडवार,भरत कोकावार, अरूण भोसले, रूपेश वैद्य तनू वराडे,रूपाली सामटवार, डॉ मंजुषा देशमुख,संजय भगत कविता लोहट प्रतीभा ठाकूर पंकजा गादेवार ,रजनी सुरकार आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

