जिल्हाप्रमुख विनय गिरडे यांचे शिवसैनिकांना आव्हान…
कंधार प्रतिनिधी.ज्ञानेश्वर कागणे
नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. लोहा कंधार मतदार संघातही महायुतीचा आमदार असून ते राष्ट्रवादीचे असले तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. निधी वाटपातही प्राधान्य देत नसल्याने शिवसैनिकांची गोची होत आहे. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत लढवायची आणि माहिती नाही झाली तर स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी पक्षाने ठेवावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विनय गिरडे यांनी केले आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची आढावा बैठक कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना तालुकाप्रमुख ॲड मारोती पंढरे यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला गीताताई पोरोहित महिला जिल्हाप्रमुख,अमोल गोडबोले, दत्ता पाटील कदम, संतोष गिरडे,रवीभाऊ थोरात, हनुमंत कदम, अदीची उपस्थिती होती. या बैठकीत महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मोठी ताकत असतानाही व यापूर्वी कंधार लोहा मतदारसंघात शिवसेनेच्या जीवावर विधानसभेत अनेक वेळा भगवा झेंडा फडकलेला आहे, सध्या सत्ताधारी आमदार लोहा कंधार मतदार संघात शिवसेनेला जास्तीचे महत्व देत नसल्याचे खंत शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली असून कंधार नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील गावागावात जाऊन शाखा स्थापन करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले.
या बैठकीत शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख विनय गिरडे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेच्या विकासासाठी मोठमोठी कामे केली. आजपर्यंतच्या इतिहासात एकनाथ शिंदे यांच्या एवढी कामे कोणीच केली नाही,एकनाथ शिंदे हेच एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करून दररोज अनेक पदाधिकारी व शिवसैनिक पक्षात प्रवेश करत आहेत. कंधार तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे या शिवसेनेच्या ताकतीवरच महायुतीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे निवडून आले आहेत हे नाकारता येणार नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहेत यात काही शंका नाही परंतु लोहा कंधार मतदार संघात जर स्वातंत्र्य लढवण्याची वेळ आली तर शिवसैनिकांनी स्वातंत्र्य लढवण्याची तयारी ठेवावी असे आव्हान जिल्हा प्रमुख विनाय गिरडे यांनी शिवसैनिकांना केली आहे.
या बैठकीला उप ता.प्रमुख वसंत निलावाड,तिरुपती कदम,चंद्रकांत भुरेवार , शहर प्रमुख माधव तांबोळी ,चांदभाई पठाण, महीला आघाडी ता. प्रमुख पार्वती ताई केंद्रे जी.प.सर्कल प्रमुख मोहन जाधव ,संदीप पा.काळम, युवा सेना अमोल पवळे व सचिन श्रीरंगवाड, माधव राहटे, संतोष तपासे, यांच्या सह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. *
सेनेच्या 59 व्या वर्धापन दिनाचे अवचित साधून कंधार तालुका शिवसेनेच्या वतीने जेष्ठ पदाधिकारी व शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी नगरसेवक वसंत पापीनवार, माजी शहर प्रमुख दिलीप मुखेडकर, संजय बिडवई,विठ्ठल बासटवार,ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण कांगणे, वसंत निलावाड, यासह ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला.