प्रतिनिधी : नागनाथ लांजे
सेवा निवृत्त केंद्रप्रमुख यांच्या वतीने शालेय शिक्षण साहित्य वाटप
जि.प. प्रा.शाळा लांजी येथे पालक मेळाव्याचे औचित्य साधून सेवा निवृत्त लांजी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख कोनाळे सरांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपक्रमशील व शिस्तप्रिय केंद्रप्रमुख कोनाळे सरांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले.
कमी वेळेमध्ये शाळेचा खुप विकास केला जिल्हा व राज्य स्तरावर शाळे मुळे गावाचे नाव झाले आम्ही कधीही सरांचे मोल विसरू शकणार नाही आश्या भावना सरपंच कालिदास कदम यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या वेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विष्णू गायकवाड
लांजी तांबटसांगवी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच श्री. कालीदास कदम ,उपसरपंच श्री आबास पटेल ,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री रामानंद मुंढे ,ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय कच्छवे ,शालेय शिक्षण समिती उप अध्यक्ष श्री बालाजी मुंढे ,व गावातील उपस्थित पालक लिंबाजी पोपतवार, संग्राम मुंढे,संतोष गायकवाड, संग्राम आगलावे,तानाजी लांजे,कैलास आगलावे,नवनाथ गायकवाड ,दत्ता गोणशेटे,गोविंद हिवरे ,अंबादास कोंटबे,दिपक पोपतवार, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विकास पोपतवार, जगदीश गायकवाड व शिक्षक कर्मचारी आणि गावातील महिला विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आभार विष्णू गायकवाड यांनी मानले..!!


