माहिती संकलन विभाग प्रमुख: – पियुष गोंगले.
एटापल्ली - आज दिनांक २६/०६/२०२५ रोजी भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डाॅ. सुधीर भगत मराठी विभाग प्रमुख, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ संदिप मैंद, प्रा. डाॅ. विनोद पत्तीवार ग्रंथालय प्रमुख, प्रा. डाॅ. विश्वनाथ दरेकार राज्यशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. निलेश दुर्गे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डाॅ. शरदकुमार पाटील, प्रा. डाॅ. राजीव डांगे, प्रा. चिन्ना पुंगाटी इतिहास विभाग प्रमुख, प्रा. राहुल ढबाले सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. डाॅ. श्रृती गुब्बावार प्रानिशात्र विभाग प्रमुख, प्रा. डाॅ. साईनाथ वडस्कर, प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. अतुल बारसागडे, प्रा. स्वाती तंतरपाळे व शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.


