बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
बुलढाणा.(चिखली ) अज्ञात चोरट्यांनी तीन घरांवर दरोडा टाकून दोन वयोवृद्ध महिलांच्या अंगावरील दागिणे व रोख रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केला.
चिखली तालुक्यातील मलगी येथे घडली. चिखली तालुक्यातील मलगी येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांत राऊत यांनी माहिती दिली की. सोमवारीच्या मध्यरात्री गावकरी गार झोपेत असताना अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गावातील प्रल्हाद कोंडू पवार यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला असता घरात समोरच्या खोलीत दोन वयोवृध्द आजी झोपलेल्या होत्या आणि इतर जण आतील घरात झोपलेले होते. हे पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरात हात साफ करून समोरच्या खोलीत येवून दोन्ही वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथा, कानातील सोन्याचे दागिने तोडून नेले. तेव्हा महिलांनी आरडा ओरडा सुरू केला.
मात्र चोरटे तेवढ्या वेळात लगेच दुसऱ्या गावाला लागून असलेल्या प्रभाकर शिवनारायण भुसारी यांच्या घरात पाठीमागून प्रवेश करून घरातील लोखंडी पेटी उचलून गावाबाहेर घेवून गेले आणि पेटी फोडून पेटीतील नगदी १५ हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने मोठ्या प्रमाणावर गावकरी गोळा झाले आणि घटनेची माहिती तंटामुक्ती अध्यक्ष राऊत यांनी पोलिसांना दिली.
त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचासमक्ष पंचनामा करून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. लवकरच चोरटे ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरी मध्ये गेलेला माल हस्तगत करण्यात येइल असे सांगण्यात आले.


