अकोला जिल्हा प्रतिनिधी :-इमरान खान सरफराज खान
अकोला : शहर कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत 29 वर्षीय तरुण इकरम खान इलियास खान याला विदेशी पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंडसह अटक केली. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 20 हजार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहर कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय गवई यांना गांधी जवाहर बागेजवळ एक तरुण पिस्तुल घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ त्यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक गांधी जवाहर बाग येथे सापळा रचून बैदपुरा हुमायून नगर येथील इकराम खान इलियास खान याला पकडण्यात आले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, एसडीपीओ सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळू पवार, डीबीचे मुख्य सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर, अजय भाटकर, किशोर येउल, नीलेश बुंदेले यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
पोलीस आता आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.


