दोन बैल बचावले एक मरण पावला..
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे आज दि २५ जुन ला दुपारी अंदाजे १२ ते १ च्या दरम्यात गावातील नाल्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना बैलगाडी व एक बैल तरंगताना दिसला.
तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी कोणीतरी बुडालेले आहे तेव्हा त्यांनी गावात माहिती दिली
गावातील लोकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व सदर घटनेची माहिती वडकी पोलिसाला दिली असता, पोलिस घटनास्थळी दाखल झाले .
गावातील युवकांनी पाण्यात उडी मारुन शेतकऱ्यांचा शोध घेत असताना बैलगाडी व बांधुन असलेला एक बैल मरण पावलेला मिळाला. तसेंच एक ते दोन तासांच्या शोध कार्या नंतर शेतकऱ्यांचा मृत्यूदेह हाती लागला.
पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर दहेगाव येथील शेतकरी राजु रोकडे वय ५५ वर्षे हे असल्याचे सिद्ध झाले .
कुटुंबा कडुन मिळाले माहिती नुसार राजु रोकडे शेतात कामासाठी जात असताना नाल्यावर बैल पाणी पिण्यासाठी घेऊन गेले असतील असा अंदाज लावण्यात आला.
वडकी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठविण्यात आले
सदर घटनेचा तपास वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुनील कुडमथे धनंजय येसेकर पो ,हा होमगार्ड प्रविण चौधरी करीत आहे.
राजू रोकडे यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी ,जावई ,सुन, नातवंडे असा आप्त परिवार आहे.
या घटनेने गावकरी हळहळ व्यक्त करत ….


