अकोला विभाग प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
बार्शीटाकळी: अंधारसावंगीतील सुनील गजानन देवकर (२५) याने १७ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून त्रास देत डिसेंबर २०२२ मध्ये वाघागड धरणाजवळील जंगलात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला.
त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला गप्प बसवले. अखेर फिर्यादीनंतर पिंजर पोलीस ठाण्यात ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
आरोपीला चान्नी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी अटक करण्यात आली. तपास एपीआय गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

