अपंग जागरुकता बहुउद्देशीय संस्था अपंग सेल जिल्हाध्यक्ष मोहसीन अख्तर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली मागणी…
अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर*
शासनाच्या दिशानिर्देशानुसार प्रत्येक महानगरपालिकेच्या ठिकाणी दिव्यांग समिती असणे आवश्यक आहे. या समितीच्या माध्यमातून दिव्यांगाच्या विविध समस्या, दिव्यांगांचे मानधन याविषयी कार्य करण्यामध्ये सुसुत्रता येवून शासनाच्या योजनांविषयी जनजागृती या समितीच्या माध्यमातून होवून कोणीही दिव्यांग शासकीय योजना अथवा मानधनापासून वंचित राहणार नाही याकरिता या समितीची नितांत आवश्यकता ही अकोला महानगरपालिकेमध्ये असून अनेक संघटनांच्या माध्यमातून समिती तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आलेल्या असून अद्याप मात्र या मध्ये ठोस असा निर्णय घेवून समितीची स्थापना करण्यात आलेली नाही, त्यामुळे अकोला महानगरपालिके अंतर्गत दिव्यांग समितीची लवकरत लवकर स्थापना करण्याची मागणी अपंग सेल जिल्हाध्यक्ष मोहसीन अख्तर यांनी केली आहे.
यावेळी अपंग सेल जिल्हाध्यक्ष मोहसीन अख्तर, मोहम्मद सोहेल, शेख मोहम्मद, शरफोद्दीन, रोहित दिपक पांडे, मोहम्मद राजीक आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

