रायगड जिल्हा प्रतिनिधी:- कैलासराजे घरत खारपाडा पेण
आज २४ जून २०२५ …१२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! म्हणजेच आज लोकनेते दि.बा.पाटील जाऊन १२ वर्षेम्हणजेच एक तप पूर्ण झाले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे याच्या समर्थनार्थ आज सर्वपक्षीय बाईक रॅली, रिक्षा रॅली काढण्यात आली होती. ही रॅली सकाळी ठीक ११ वाजता वाशी नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटर येथून सुरू झाली. यावेळी दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष श्री.दशरथ दादा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, भिवंडीचे खासदार श्री.सुरेश बाळ्या मामा, सर्वेश तरे, कवी, आर्टिस्ट मोरेश्वर राजाराम पाटील खारीगाव, संतोष घरत,दीपक पाटील, दीपक म्हात्रे,निलेश पाटील, संतोष केणे, विजय पाटील, कृती समितीचे सर्व पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र महिला पुरुष पदाधिकारी, तसेच अनेक सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृती समितीचे पदाधिकारी यांनी झेंडा दाखवून सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथून या रॅलीला सुरुवात झाली ती पाम बीच मार्गे रेतीबंदर गेट विमानतळ ते चिंचपाडा पनवेल येथील कालभैरव मंदिर येथे सांगता झाली. एकच धून..२४ जून..लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ..अशी फलक घेऊन तरुण महिला वर्ग यांचा उत्फूर्त सहभाग होता. यातून सरकारने शोध बोध घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा विचार करून लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे.लोकनेते दि. बा. पाटील शेवटच्या श्वासापर्यंत न्याय हक्कांसाठी लढले.

देशपातळीवरील गोरगरिबांसाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या नेत्यांमध्ये ते आहेत. उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले, त्यांचे ते प्रणेते आहेत. त्या आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. त्यामुळे यांची जाण ठेवून तरी विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का? दिबांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे. म्हणजे ते जाऊन एक तप झाले. सरकार किती दिवस चालढकल करणार, असे रोखठोक मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी दिबांना स्मरण करताना व्यक्त केले.

