सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद/महागांव दि 23
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी संदेश गौतम रणवीर यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या पुसद येथील स्थानिक स्वराज्य संस्था आढावा बैठकीत त्यांना पक्षाचे जिल्हा निरीक्षक अफजल फारुखी यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष सुखदेव जाधव यांचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
अनुसूचित जाती जमाती च्या समस्यांना वाचा फोडून त्यांची कामे कणखरपणे करण्यात व न्याय मिळवून देण्यात त्यांनी आजवर केलेल्या कामाची दखल घेऊन ही नियुक्ती देण्यात आली असून या नियुक्तीचे श्रेय ते शरद मैंद प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना देतात.
यावेळी जिल्हाध्यक्ष वर्षा निकम, महिला जिल्हाध्यक्ष नलिनी ठाकरे,अनुकूल चव्हाण, अकील मेमन, व राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले या पदाचा सन्मान करून भविष्यात सक्रियपने संघटना बांधणी करून पुरोगामी विचार जनमानसात रुजवीन्यात कसर ठेवणार नसल्याचे रणवीर यांनी या वेळी सांगितले

