मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, डॉ. अशोकजी नेते यांची चंद्रपूरातील विवाह स्वागत समारंभाला उपस्थिती
दि. ११ जून २०२५ | चंद्रपूर
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. हंसराजजी भैय्या अहीर यांच्या सुपुत्र चि. शामल आणि चि.सौ.कां. दीपिका यांचा विवाह स्वागत समारंभ चंद्रपूर येथे अत्यंत उत्साहीत व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या शुभप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.ना. चंद्रशेखरजी बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची उपस्थिती लाभली.

या विवाह सोहळ्याला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी विशेष सदिच्छा भेट दिली. त्यांनी चि. शामल व चि.सौ.कां. दीपिका यांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सोबत जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, भाजपा चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष अविनाशभाऊ पाल, पंकज लाडवे आदी मान्यवरही उपस्थित होते.
राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा विवाह सोहळा अहीर परिवारासाठी अत्यंत आनंददायक आणि संस्मरणीय ठरला.

