राजुरा शहरातील शिवलहरी कॉम्प्लेक्स, बस स्टँड समोर गायत्री बोढे हिने नुकतेच *‘नाष्टा नुक्कड*’ हे आपल्या खास चविष्ट पदार्थांनी सजलेले हॉटेल सुरू केले आहे. नामदेव बोढे यांची कन्या गायत्री हिने हॉटेल मॅनेजमेंटमधील आपली डिग्री पूर्ण करून व्यवसाय क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल ठेवले आहे.या हॉटेलमध्ये पाणीपुरी, दहिपुरी, रगडा पॅटीस, पापडी चाट, फ्रेंच फ्राईज, क्लासिक सॉल्टेड फ्राईज, चीज बस्ट फाईज,इडली, डोसा, वडा-सांबार यांसारखे उत्तम दर्जाचे स्ट्रीट फूड तसेच साउथ इंडियन डिशेस आणि विविध बेवरेजेस ग्राहकांना मिळणार आहेत.
पदार्थांची चव ग्राहकांच्या मनाला भुरळ घालत असून, दरही अतिशय वाजवी आहेत.हॉटेल सुरू झाल्यापासून राजुरा शहरातील नागरिकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया हेच यशाचे द्योतक आहे.

मराठी मुलीने व्यवसायाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.आज मी व माझी पत्नी पूनम सारंग गिरसावळे यांनी या हॉटेलला भेट देऊन गायत्री बोढे हिला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तिचे वडील श्री. नामदेव बोढे व बहीण नानू यांचीही उपस्थिती होती.
गायत्रीच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी अनेक शुभेच्छा!


