अकोला जिल्हा प्रतिनिधी गणेश वाडेकर
दादा साद देतील का…..?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे तब्बल 14 15 वर्षानंतर कार्यक्रमासाठी अकोला दौऱ्यावर येत आहेत .
या अगोदर दादा आले असता त्यांनी सहकार नेते यांच्या निवासस्थानी जेवण केले होते यावेळेस त्यांनी जेवणासाठी आमदार अमोल दादा मिटकरी यांचे निवासस्थान निवडले अमोल दादा मिटकरी हे गरिबीतून आलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या इथे जाण्याचा आम्हाला आक्षेप नाही.दादांनी यावेळेस माझ्यासारख्या निष्ठावान पक्षाची पंचवीस वर्ष निष्ठा बाळगून असलेल्या कार्यकर्त्याच्या घरी चहापाणी घ्यायसाठी योग्य पाच मिनिटे तरी वेळ द्यावा मला 25 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कुठल्याही मंडळावर ,जिल्ह्याच्या समितीवर, किंवा सर्वात खाली विशेष कार्य दंडाधिकारी या पदावर सुद्धा नेमणूक केली नाही.
माझीच नाही तर माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा कुठेच नेमणूक झाली नाही, पक्षाने फक्त जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या मी प्रमाणिकपणे पार पाडल्या सेवादल संघटक, सेवा दल महानगर अध्यक्ष, प्रदेश संघटन सचिव, अमरावती शहर निरीक्षक, ओबीसी महानगर अध्यक्ष, असे पदे पार प्रमाणिकपणे निभावले मी संघटन मध्येच काम करत आलो असून प्रत्येक वेळेस माझ्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अन्याय झालेला आहे
पहिले काँग्रेस सोबत आघाडीमध्ये नंतर पक्षातीलच काही लोकांनी दुसऱ्यांना तिकीट देऊन माझ्यावर अन्याय केला परंतु मी कधीही आक्षेप घेतलेला नाही जाऊ द्या जे झालं ते झालं. मी दादांच्या मुंबई येथील मंत्रालय मधील सहाव्या माळ्यावर स्वर्गीय शिवाजीराव कोरडे यांच्या सोबत होतो त्यावेळेस आमचा जीव कसा वाचला आहे आम्हालाच माहीत आहे त्यावेळेस सुद्धा पक्षाच्या कामासाठीच आम्ही तिथे होतो परंतु दादा आता अकोला जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत तरी माझ्या घरी दादांनी चहासाठी तरी यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे
मी तसे निवेदन त्यांचे पीए अनिल ढिकले, सुनील मुसळे, संदीप वराडे साहेब आदींना पाठवलेले आहे परंतु त्यांचा अद्याप पर्यंत मला उत्तर आलेलं नाही तरी हे खुले पत्र मी दादांना पाठवीत आहे ..
आपला स्नेहांकित
अनिल मालगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषदे प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रामाणिक कार्यकर्ता..


