रायगड जिल्हा प्रतिनिधी :- कैलासराजे घरत (खारपाडा पेण)
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे(फेडरेशन)
संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर यांच्या आदेशाने ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट मनोहर पाटील साहेब यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या(फेडरेशन)
रायगड जिल्हा विधी सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.
गेली कित्येक वर्षे दुष्मी खारपाडा पंचक्रोशीतील गोरगरीब नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी तंटामुक्ती समिती खारपाडा यांच्या माध्यमातून तडजोडीने दावे मिटविण्याचे एकहाती कार्य केले. अशा या धडाकेबाज व्यक्तिमत्त्वाची वरील पदावर नियुक्ती झाली हे खऱ्या अर्थाने त्या पदास न्याय दिल्यासारखे आहे त्यामुळेच समाजातील विविध माध्यमातून त्यांच्या या नियुक्तीचे खऱ्या अर्थाने स्वागत केले आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये, हितचिंतकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे कुटुंबीय पत्नी सौ.भारती मनोहर पाटील, मुलगा कु.आदित्य मनोहर पाटील, न्यू सूर्या स्पोर्ट्स कळंबोलीचे डायरेक्टर विनायक म्हसकर, कातलाचा नंबर संघर्ष समिती, वन हक्क संघर्ष समिती दुष्मी खारपाडाच्या जागरूक स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

ॲड.मनोहर पाटील साहेब यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या(फेडरेशन)रायगड जिल्हा विधी सल्लागार पदी नियुक्ती होताच पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या उमेदीने गोरगरीब जनतेला मोफत सल्ला देऊन न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी २४ तास ३६५ दिवस आमचे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सदैव सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री.कैलासराजे निर्मला कमलाकर घरत, शिवसेना पेण तालुका संघटक श्री.प्रशांत बाळकृष्ण घरत, सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष बाबूराव घरत, श्री.रत्नाकर घरत, श्री.यशवंत घरत, श्री.हनुमान घरत यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
पेण तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मित्रमंडळीं, मित्रपरिवार तसेच दुष्मी खारपाडा पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


