माहिती संकलन विभाग प्रमुख:- पियुष गोंगले
हिंगणा:- नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी (महाजन वाडी) येथे सन 2002 पासून भाग्यश्री सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले असून यामध्ये अनेक थोर विचारवंताची पुस्तके, स्पर्धा परीक्षेचे नोट्स, दैनिक वृत्तपत्रे, वाय-फाय सुविधा अशा अनेक सुविधा युक्त वाचनालय या भागात सुरू असल्याचे लक्षात येता प्रा. डाॅ. विश्वनाथ दरेकार व मुख्याध्यापिका सौ. सुजाता दरेकार यांनी भेट दिली व प्रा. डाॅ. अतुल लामसोंगे यांच्याशी चर्चा केली असता सदर वाचनालयास सरकार कडून कोणतेही अनुदान न घेता हे वाचनालय सुरू केले आहे.
याचा फायदा या भागातील अनेक तरूण, वयोवृद्ध, सेवानिवृत्त कर्मचारी यांना होत असल्याचे दिसून आले. सदर वाचनालयासाठी डॉ. अतुल लामसोंगे यांनी एक रूम उपलब्ध करून दिल्या बदल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. समाजातील अनेक सामान्य, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना या वाचनालयाचा लाभ होत आहे. आपले एक सामाजिक कर्तव्य समजून सदर वाचनालयास प्रा. डाॅ. विश्वनाथ दरेकार व मुख्याध्यापिका सुजाता दरेकार यांनी भेट वस्तू स्वरूप (साऊंड सिस्टीम) दिली.

वाचनालायातर्फे विविध सांस्कृतिक, राष्ट्रीय, राज्यसरकारच्या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात उपयोगी येईल.वाचनालाकडून पर्यावरण सप्ताह निमित्त राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा.डाॅ.विश्वनाथ दरेकार व मुख्याध्यापिका सौ.सूजाता दरेकार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.विनायक इंगळे ज्येष्ठ पत्रकार, प्रमुख पाहुणे प्रा.दिपक रामटेके बौध्द महासभा सदस्य, प्रा.डाॅ.विश्वनाथ दरेकार, मुख्याध्यापिका सौ.सुजाता दरेकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री.पांडुरंग काळे यांनी केले.तर आभार प्रा डॉ.अतुल लामसोंगे यांनी मानले.

