गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ.
उमरखेड :-वृक्षसंवर्धन सेवा समिती उमरखेडचे पदाधिकारी तसेच श्री तेजमल गांधी कृषी महाविद्यालय ब्राह्मणगाव येथे कार्यरत प्राध्यापक अशोक शिरफुले यांना यावर्षीचा सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . त्यांनी ब्राह्मणगाव व परीसरात हजारो वृक्षाची लागवड करून त्यांचे संवर्धन केले तसेच उमरखेड येथे औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून उमरखेड हिरवे करण्याचे कार्य अविरत त्यांनी केले आज वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज झाली असून त्यांच्या या कार्यामुळे त्यांना भाऊसाहेब माने गौरव कृती समिती तर्फे आयोजित सत्यशोधक भाऊसाहेब माने 2024 चा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किसनराव वानखेडे, अध्यक्ष कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर विजयराव माने, नितीन भुतडा महेश काळेश्वरकर नितीन माहेश्वरी, अँड अनिल पं.माने, शिवाजीराव भाऊसाहेब माने चीतांगराव कदम या मान्यवरच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले . त्यांनी हा पुरस्कार वृक्ष संवर्धन सेवा समिती उमरखेड यांना समिती समर्पित केला आहे . यावेळी वृक्ष संवर्धन सेवा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


