प्रल्हाद निर्मळ:- (परभणी जिल्हा प्रतिनिधी )
धारासुर ता.गंगाखेड येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शाळेत आवड निर्माण होईल असे उपक्रम होतकरू शिक्षक वर्गाकडून राबविण्यात येत आहेत. त्याला विद्यार्थी वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेंच गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गावातील नागरिकांच्या कडून श्री जामगे गंगाधर माणिकराव मुख्याध्यापक,श्रीमती बागडे रुपाली नंदकुमार,श्री शिवणकर मोहन त्र्यंबकराव,श्रीमती कटकमवार वैशाली विश्वनाथ,श्री वच्चे सुधाकर धुळाप्पा,घाटके विश्वनाथ राजाराम,श्रीमती बोडके सुलोचना रामराव,श्रीमती ताटीकोंडलवार रश्मी रमाकांत,श्री पोटपेलवार मयुर मारोती,श्रीमती सोळंके अक्षरा पांडुरंग तसेंच शाळेतील इतर सर्व शिक्षक तसेच कर्मचारी वर्गाचे गावातून विशेष कौतुक होत आहे…..


