गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड :श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोफाळी येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष, जिल्हा परीषदेचे प्रथम अध्यक्ष, लोकनेते माजी आमदार देवराव पाटील चोंढीकर यांचा स्मृतिदिन नुकताच येथील विद्यालयामध्ये संपन्न झाला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शेख महेमुद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रवी शिलार,प्रा . अवधूतराव देवसरकर,सुरेश सुरोशे, अनिल नगरधने हे होते . यावेळी मुख्याध्यापक शेख महेमुद यांनी देवराव पाटील चोंढीकर यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद येथे शिक्षण रूपी रोपटे लावले होते आज त्या रोपटयाच एका महाकाय वटवृक्षामध्ये रुंपातर झाले आहे विद्यालयाबरोबरच त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी श्री शिवाजी वस्तीगृहा ची स्थापना केली . देवराव पाटील चोंढीकर यांनी शेषराव पाटील, रावसाहेब देशमुख, नारायणराव शिलार मामा, विठ्ठलराव देशमुख स वनेकर, गुणवंतराव देशमुख, गोविंदराव पाटील,बाबाराव पाटील यांच्या सारख्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून उमरखेड,महागाव, पुसद येथे शिक्षणाची गंगा आणली या सर्व लोकांच्या प्रयत्ना व प्रेरणेमुळे आज हजारो विद्यार्थी शिकून मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत असे उदगार यावेळी बोलताना काढले . प्रास्ताविक प्रविण सूर्यवंशी यांनी करुन लोकनेते देवरावपाटील यांचा सहकार, सामाजिक,शिक्षण आणि राजकीय प्रवास कसा होता . त्यांच्या कार्याचा, विचारांचा आजच्या पिढीने आदर्श घेणे गरजेचे आहे असे आपल्या प्रास्तावीका तुन बोलताना सांगितले . कार्यक्रमाचे संचालन माणिकराव कांबळे यांनी केले तर आभार प्रकाश जाधव यांनी केले .
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते..


