लोहा,(शुभम उत्तरवार)
हिंदु धर्मात वटपौर्णिमा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिलांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे वट पोर्णीमा.या दिवशी महिला हाच नवरा मला सात जन्म मिळावा म्हणून वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करतात.काल दि.१० जून रोजी लोहा शहरातील देवूळगल्ली येथे महिलांनी वडाच्या झाडाला १०८ वेळा प्रदक्षिणा घातल्या.
पौराणिक कथे नुसार सती सावित्रीच्या पतीचे यमाने प्राण हरल्यानंतर पतीचे प्राण परत आणण्यासाठी सावित्रीने अनेक अडथळे पार करून यमाचा पाठलाग करून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत मिळविले होते.विशेष म्हणजे यमाकडून सावित्रीने वडाच्या झाडाखालीच सत्यवानाचे प्राण परत मिळविले असल्याच्या कथे नुसार आपल्या पतीच्या आरोग्य, दिर्घायुष्य व हाच नवरा पुढचे सात जन्म मिळू दे या साठी विवाहित स्त्रिया वटपोर्णिमेला उपवास करून वट पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या परिसरातील वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाची मनोभावे रितीरिवाजा प्रमाणे पुजाअर्चा करतात.दोरा १०८ वेळा वडाच्या भोवती गुंडाळून नव-याला दिर्घायुष्य,आनंद व हाच नवरा सात जन्म मिळू दे यासाठी प्रार्थना करात.वट पौर्णिमेचा सण लिंबोनी गल्ली , देऊळगल्ली, श्रीराम नगर,शिक्षक कौलनी,जूना लोहा,शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी देवुळगल्ली येथे वटपौर्णिमा साजरी करताना सौ.ज्योतीताई पवार,सौ.संगीता चन्नावार,सौ.मिनाताई पौळ,सौ.अनिता चन्नावार,सौ.अमृताताई पवार यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.


