विदर्भ विभाग प्रमुख :- युसूफ पठाण
वृक्ष सेवा समितीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने व 365 वे साप्ताहिक श्रमदान शिबिरा अंतर्गत सिंधी मेघे येथील स्मशानभूमीला लागून असलेल्या टेकडीवर आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. विदर्भातील शहरांचं वाढतं तापमान आणि भविष्यातील पाण्याची निर्माण होऊ शकणारी समस्या याचा सखोल अभ्यास केल्यास वृक्षारोपण व संगोपन हाच खऱ्या अर्थाने रामबाण उपाय ठरू शकेल म्हणून मोठ्या प्रमाणात विदर्भातील लोकांनी वृक्षरोपण व संगोपणामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे असे वृक्ष सेवा समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी कार्यक्रमाला अविनाश जी काकडे, किशोर बोकडे, पुरुषोत्तम टोणपे, दिलीप भुजाडे, बाबाराव आगलावे, राजेश बोरसरे, सतीश बोरसरे, गणेश निमसटकर, अभय घोडकांदे, कन्हैया छानगाणी, श्रीधर मून, विशाल खंनगण, भूषण घरोटे, अविनाश मोहरले, अनिल पसीने, शुभम सातपुते, रवी नागपूरकर, राहुल गोल्हार, किशोर बाहे, प्रदीप मेंढे, विजय गावंडे, हर्षल व्यास, प्रतीक पांडे, अश्विन कांबळे, दिलीप दुबे, अशोक भिवगडे, प्रमोद सातपुते, सुशील शिरे, सौ वैशाली शिरे, सौ कांचन भिवगडे, सौ पूजा पोतदार, मनीष पोतदार,श्रीकांत शेंडे, श्यामभाऊ परसोडकर, श्रीकांत कहाते,योगेश चौधरी इत्यादी लोकांनी वृक्षरोपण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
वृक्ष सेवा समिती वृक्षारोपण व संगोपन हेच खरे ध्येय जीवन या तत्त्वावर मागील चोवीस वर्षापासून कार्यरत आहे तसेच सिंधी मेघे स्मशानभूमीच्या लागून असलेल्या या टेकडीवर 2017 पासून सातत्याने साप्ताहिक श्रमदानाच्या माध्यमातून वृक्ष संगोपनाची चळवळ पेपर रद्दी संकलनाच्या सहकार्यातून राबवित आहे.

