अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
ऑपरेशन प्रहार अंतर्गत NDPS कायदया अंतर्गत २०२५ मधील सर्वात मोठी कार्यवाही… स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन अकोल्यातील गंगानगर मधुन ३६ किलो गांजा जप्त..
दिनांक ०९/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, पो.स्टे. जुने शहर परिसरातील गंगानगर येथे ०२ महिला घरात अमंलीपदार्थ गांजा विक्रीचा व्यवसाय करतात.
अशा माहितीवरून रेड करून महीला आरोपी नामे १) बिलकीस बानो सैय्यद रफीक २) कनिज फातेमा सलीम शाह याचे घरातुन एकुण ३६ किलो ०२ ग्रॅम ओलसर गांजा कि.अं. ७,३५,४००/ रू चा मुद्देमाल शासकीय पंच, राजपत्रित अधिकरी यांचे उपस्थिीतीत जप्त करण्यात आला वरून आरोपी विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये कारवाई करून आरोपीस पुढील कारवाई कामी पो.स्टे. जुनेशहर अकोला यांचे ताब्यात देण्यातआले.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला स.पो.नि. विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव व सहा. पोलीस उपनिरिक्षक राजपालसिंह ठाकुर, पोलीस अमंलदार, फिरोज खान, अब्दुल माजीद, रविद्र खंडारे, अविनाश पाचपोर, वसीमोद्दीन, भास्कर धोत्रे, एजाज अहमद, खुशाल नेमाडे, किशोर सोनोने, आकाश मानकर, स्वप्नील खेळकर, स्वप्नील चौधरी, उदय शुक्ला, अन्सार अहमद, अशोक सोनवणे, महिला अंमलदार मेधा मुळे, स्वप्ना चौधरी व चालक मनिष ठाकरे, प्रशांत कमलाकर, विजय यादव, पोलीस मुख्यालय यांनी केली आहे.


