बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील वर्मा
लोणार:- आज वटपौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीने पर्यावरणाचे महत्त्व जाणून मोठ्या प्रमाणात वटवृक्षाची लागवड लोणारकर उद्यानात केली यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद च्या तालुका अध्यक्ष महिला आघाडी डॉ अनुपमा झोरे यांनी ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना पटवून दिले तसेच मोठ्या प्रमाणात वटवृक्ष लावावीत असा संदेश त्यांनी दिला

यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सचिन कापुरे, डॉक्टर प्रदीप झोरे वन्यजीव विभागाचे गुलाब जावळे धनंजय गाडेकर, गोविंद मोरे, अनिल अवचार, तसेच समता परिषद महिला आघाडीच्या मंजुषा खरात, सविता अवचार, गंगा खराडे, पूजा झोरे, सुजाता कापुरे, रीना जाधव, ज्योती अवचार, अर्चना अवचार व इतर समता परिषदेचे मान्यवर उपस्थित होते.


