लोहा (शुभम उत्तरवार)
दि.५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोहा शहरातील ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे भारतीय जनता पार्टी लोहा शहर मंडळ च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही नेहमीच सामाजिक, शैक्षणिक राजकीय व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असते वृक्ष लावणे व ते जपून वाढविणे ही काळाची गरज आहे.
वृक्ष एक फायदे अनेक आहेत . वृक्षामुळे आपणास शुद्ध ऑक्सिजन मिळतो, सावली मिळते, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मदत होते व जिथे जास्त झाडे असतात तिथे जास्त प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे प्रत्येकांनी आपले कर्तव्य म्हणून किमान एक तरी झाड लावून ते वाढवावे असे मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले.यावेळी कार्यक्रमाला कार्यक्रमांचे आयोजक भारतीय जनता पार्टी लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगरसेवक युवराज वाघमारे, माजी नगरसेवक नबीसाब शेख, माजी नगरसेवक अमोल व्यवहारे, ग्लोबल इंग्लिश स्कूल चे उपाध्यक्ष दिनेश मोटे, माजी तालुका उपाध्यक्ष नागनाथ पाटील चुडावकर, पत्रकार डी एन कांबळे,हाळदवचे माजी सरपंच भिमराव शिंदे लक्ष्मण फुलवरे, बबनराव नावदे, गोविंद वड, पांडुरंग रहाटकर, ,टिकाराम कतुरे, व्यंकट दांगटे, सतीश मोरे, विश्वनाथ भालेराव विनय चदेंवाड यांच्यासहित मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

