बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
बुलढाणा:- खामगाव महामार्गावरील बायपासच्या पुलावर शेलोडी नजिक काल रात्री खासगी ट्रव्हर्ल्सखामगाव-नांदुरा मार्गावर लाबेला हॉटेलसमोर पडला. पुलाजवळील मोठ्या खड्डयात दुचाकी आदळून एकाचा मृत्यू झाला तर सोबतचे दोघे साहिल खान साबीर खान व उमेरखान महेबुबखान रा. जळगाव जामोद हे गंभीर जखमी झाले. नांदुरा रस्त्याचे काम संधगतीने सुरु असल्याचे मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळेच पडलेल्या खड्यात अपघात घडून एकाचा मृत्यू झाला.
ट्रव्हल्स क्रमांक एआर ११ ई १५०० ने ट्रक क्रमांक एमपी २७ टीड़ोड २४६६ ला धडक दिली. या अपघातात दीपक शंकरलाल चव्हाण रा. बालनगर जि. उज्जैन, बुखारसिंग कसाव वय ६० रा. देवास, राजापदम पवार वय २५ रा. सनावत जि. खंडवा हे तिघे जण गंभीर जखमी झाले तर राधेश्याम रामलाल परमार वय ५० रा. मालगावडी जि. उज्जैन यांचा मृत्यू झाला. लाबेला हॉटेलनकि घडलेल्या दुचाकी अपघातात, दुचाकी क्रमांक एम. एच.२८ एफ ९१०९ ही खड्ड्यात आदळली.
यामध्ये साबीरखान सुभानखान बय ४७ रा. जळगाव जामोद यांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. नांदुराः अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल ८ जून रोजी सकाळी ६ वाजे पूर्वी नॅशनल हायवे क्रमांक ५३ वड़ी शिवार हॉटेल लक्ष ते बडी फाट्यादरम्यान गंगुबाई मोरीजवळ उघडकीस आली. या अपघातात शेख कादर शेख उस्मान वय ३४ रा. पंचवटी नांदुरा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी शेख उस्मान यांच्या फिर्यादवरुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यावेळी मदत कार्यासाठी ओमसाई फाउंडेशन चे अध्यक्ष व स्वयंसेवक विलास निंबोळकर, अश्विन फेरण, नाना जोशी, विष्णू धांडे, कृष्णा वसोकार, बाळू राऊत, राहुल निमकडे, नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रमोद चिखलकर, मुन्ना सय्यद, देवानंद शेजोळ, वेरुळकर, स्वप्निल खंडारे, यांनी घटनास्थळावर जाऊन मदत कार्य केले

