बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
बुलढाणा :-
नांदुरा येथील भिम नगर भागातील अमित संतोष तायडे हा चिमुकला आज ९ जून रोजी सकाळी घराच्या गच्चीवर खेळण्याकरता गेला असता त्याला विजेचा शॉक लागून तो जवळपास ८० टक्के भाजला आहे. गंभीर अवस्थेत अमित ला सुरुवातीला नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे अधिकच्या उपचारासाठी नेण्यात आले. सध्याचा बेभरवशाचा निसर्ग, हवा, पाणी, वादळे, यामुळे महावितरणच्या तारांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे बऱ्याच ठिकाणी तारा ह्या अक्षरक्ष लोंबकळतांना दिसत आहेत आणि विजेचे खांब सुद्धा वाकलेले आहेत त्यामुळे तारांची उंची कमी झालेली आहे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी तारा ह्या घरांवर दोन ते तीन फुटापर्यंत आलेल्या आहेत अशा वेळेस नागरीकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो हे माहीत असून सुद्धा महावितरण कडून कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा दुरुस्तीचे काम करण्यात येत नाही. नागरिकांनी तक्रार किंवा सूचना केल्यास त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिले जातात,.
अशाच प्रकारे आज सकाळी अमित तायडे हा निरागस मुलगा आपल्या मोठ्या बहिनीसोबत खेळण्याकरता गच्धीवर गेला असता त्याचा हात विजेच्या ताराला लागल्याने सदर पीडित मुलगा हा जागेवरच जळालेला आहे त्यामुळे महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे सदरची घटना घडली असल्याचा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये उठत आहे भीम नगर येथील समाजसेवक व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन महावितरणच्या कार्यालयाला टाळे बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे व त्याचबरोबर शासन व प्रशासनाकडून नुकसान भरपाई मोबदल्याची मागणी केली आहे. घटनास्थळाला तहसीलदार बट्टे, पोलीस निरीक्षक विलास पाटील व महावितरणचे शहराचे सहाय्यक अभियंता जैस्वाल यांनी भेट दिली

