अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या राधे नगर परिसरातील ममता अपार्टमेंटमधील अग्रवाल यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून लाखो रुपयांचा माल लंपास केला. यादरम्यान, चोरी झालेल्या मालात चांदीचे दागिने आणि सुमारे ८० हजार रुपयांची रोकड समाविष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तप सुरू केला.
यावेळी शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून भर दिवसा ह्या चोरी होत असल्याने पोलिसांना चोरांनी आवाहन दिले आहे.


