विदर्भ विभाग प्रमुख युसुफ पठाण
आज जागतिक पर्यावरण दिवस. प्रत्येक निसर्गप्रेमी मनुष्य आणि संस्था काही ना काही पर्यावरणपूरक कामे करून हा दिवस साजरा करतात. वर्धेतील वैद्यकीय जन जागृती मंच मागील 11 वर्षांपासून सातत्याने वृक्षारोपण आणि संगोपणाचे कार्य हनुमान टेकडी आणि परिसरात करीत आहे. आजच्या दिवसाचे अवचित्य साधून द सोलर सोलुशन ह्या सोलर कंपनी सोबत तसेच आधारवड आणि वर्धेतील इतर सामाजिक संस्थांना सोबत घेऊन हनुमान टेकडीवर प्लास्टिक गोळा केले आणि वृक्षारोपण केले. स्त्री -पुरुष,बाल – वृद्धापासून सर्वच जणांनी मोठ्या हिरीरीने ह्यात सहभाग नोंदवून वृक्षारोपण केले.
द सोलर सोलुशन चे संस्थापक हिमांशु घुडे ह्यांनी एक केव्ही साठी एक रोप वृक्षारोपण असा संकल्प केला आहे. मागील 2 महिन्यात जवळपास 150 के व्ही चे सोलर पॅनल लावण्यात आल्याने त्यांनी आज 150 रोप व्ही जे एम ला वृक्षारोपण साठी दिली.

व्ही जे एम चे अध्यक्ष डॉ सचिन पावडे ह्यांनी हिमांशु ह्यांच्या संकल्पचे कौतुक करून इतरांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि ही वसुंधरा आणखी फुलावावी असे आवाहन केले.
ह्या कार्यक्रमच्या यशस्वी आयोजनासाठी व्ही जे एम च्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.

