आर्णी तालुका प्रतिनीधी: – शिवम सोळंके 8767040458
आर्णी-आमदार नजर धने यांचे भाऊजी विलास इंगळे याचे सुकळी फाट्यावर अपघाती मृत्यूमहागाव येथून लग्नासाठी हदगाव येथे दुचाकीवर जात असताना सुकळी उड्डाण पुलाजवळ दुभाजकाला धडक लागून एक ठार तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ४ जून रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली.
विलास पुंडलिकराव इंगळे वय अंदाजे ४८ वर्षे रा. महागाव असे मृतकाचे नाव असून त्याचे सोबत असलेला मनोज परसराम कदम ३६ वर्षे राहणार महागाव असे जखमीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाव येथून हदगाव येथे दुचाकी क्रमांक एम एच २९ बी जे-९५८७ हे दोघे लग्नासाठी जात असताना अपघात झाला.
पुढील तपास पोलीस करत आहेत

