अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
शहरात गोवंशांच्या कत्तलींवर प्रतिबंध करण्याबाबत पोलीस अधिक्षक अकोला यांचेद्वारे सुचना प्राप्त असून आज 4 जुन रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील खैर महोम्मद प्लॉट परिसरात दोन दुकानांवर रेड कारवाह्या करुन गोवंश मासाची विक्री करणाऱ्या आरोपी शेख इरफान शेख उस्मान कुरेशी, शेख वसीम शेख करीम यांचे ताब्यातून एकूण 102 किलो गोवंश मासाचा साठा व विक्रीचे साहीत्य असा 22, 200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली आहे.

