विदर्भ विभाग प्रमुख:- युसुफ पठाण
माँ साहेब जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्राचे सुयश
वर्धेत स्त्री सबळीकरण करण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून निःशुल्क माँ साहेब जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर राबवित आहे ज्यात आत्मरक्षणाचे धडे दिल्या जात आहे याचेच परिणामी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनी कुमारी कनक दिलीप सुरकार हिला स्पोर्ट कराटे असोशिएशन द्वारा आयोजित स्पर्धेत येलो बेल्ट प्राप्त केला आहे.
ज्यामुळे कनक चे सर्वत्र कौतुक केल्या जात असून विध्यार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षित करणाऱ्या शिक्षिका कुमारी पूजा गोसटकर व संपूर्ण माँ साहेब जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्रासाठी गौरवाचा क्षण आहे हे प्रशिक्षण वर्धा विभाग मोहीम व हेल्पिंग अदर्स फाउंडेशन अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे

