मोहसीन खान लातूर जिल्हा प्रतिनिधी
दि.26-05-2025
लातूर शहराचे नाव संपूर्ण देशामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व राजकीय नेत्यामुळे झालेले आहे. याबरोबरच लातूरला रेल्वे बोगीने पाणी आले, याचीही चर्चा देशभर झाली असून यामुळे लातूरच्या विकासाला काळीमा फासली जात आहे.गेल्या काही महिण्यापासून लातूरच्या जनतेला पिवळे व घाण पाणी दहा दिवसाला मिळत आहे, जे पिण्यायोग्य नाही.
सन 1996 मध्ये मांजरा धरणातून पाणी आणण्याची योजना आपण त्या वेळी मा.ना.मनोहर जोशींच्या मंजूरीने पूर्ण केली आहे. मांजरा धरणात पाणी भरपूर असतानाही दहा दिवसाला पाणी हा लातूरच्या जनतेवर अन्याय आहे.त्यातच सामान्याला विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. पाण्याच्या गरजेपोटी टँकर बोलावल्यामुळे दर आठवड्याला सहाशे ते आठशे रूपयाचा जादा खर्च शहरातील नागरिकांना करावा लागत आहे.त्यामुळे या खर्चाचा अतिरिक्त बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे. त्यामुळे मांजरा धरणातून पाणी आणणे व शहरात रोज पाणी वाटप सुविधा त्वरीत राबविण्यात यावी.यासाठी आपण शासकीय स्थरावर पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत,अशी माहिती महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त श्री.उध्दवराव जाधव यांना दिली असल्याची माहिती माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सांगितले.
याबरोबरच शहरातील लाईटची व्यवस्था व्यवस्थित करून लाईट दिवसा सर्व ठिकाणी चालू राहते, ते बंद करण्यासाठी अद्यावत यंत्रणा बसवावी. शहरातील स्वच्छतेकडेही काळजीने लक्ष द्यावे, अशी सुचना महापालिकेचे प्रभारी आयुक्त जाधव साहेब यांना माजी आ.कव्हेकर यांनी केली आहे.

