अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
अकोल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. अकोल्यातल्या गोरेगांव येथील शेतकऱ्यांना शेतात जाणे-येण्याचा रस्ता बंद झाला. शेत रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतीची मशागत व पेरणी कशी करायची, असा प्रश्न गोरेगावच्या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला.
त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

