(सातारा विभाग प्रमुख ):-माण तालुका प्रतिनिधी निलेश कोकणे
अतिशय महत्वपूर्ण लढती मध्ये महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री जयकुमार गोरे भाऊ सलग चौथ्यांदा माण खटाव चे आमदार होण्याचा बहुमान येथील सुजान जनतेने विक्रमी मतांनी निवडून दिला.माण खटाव च्या जनतेला दिलेला दुष्काळ मुक्तीचा शब्द भाऊंनी पूर्ण करून येथील जनतेच्या मनोकामना पूर्ण केल्यामुळे या माण खटावच्या जनतेने मताच्या रूपाने आपल्या मनातील जया भाऊंना असंख्य आशीर्वाद दिले आहेत.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू म्हणून भाऊंची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. समस्त जनतेने भाऊंना जलनायक म्हणून संभोदले आहे. त्यांचे छोटे बंधू श्री शेखरभाऊ गोरे यांची साथ या महाविजयामध्ये खुप महत्वपूर्ण ठरली आहे. हे दोनीही बंधू तब्बल 12 वर्षांनंतर एकत्र झाले आणि एक विक्रमी मतांचा यशस्वी टप्पा मिळवून दिला.लाडक्या बहिणी आणि समस्त माण खटावच्या माता भगिनींनी भरघोस मतदान करून एक भाऊबीज म्हणून एक आपल्या भावासाठी असणारे कर्तव्य पार पाडले.भाऊंनी केलेला माण खटावचा विकास पाहून. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून लाखो मतांनी जयकुमार गोरेंना प्रथम पसंती देण्यात आली. सर्व विरोधकांना धूळ चारण्यात जयकुमार गोरे बंधुना यश मिळाले आहे. नुकत्याच होणाऱ्या नवीन मंत्रिमंडळात भाऊंना मंत्रिपद मिळणार याची खात्री झाली आहे.


