गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी उमरखेड
पुसद :-धनशक्ती विरूध्द जनशक्तीच्या लढाईत पुसद विधानसभा मतदार संघातून इंद्रनिल नाईक यांचा तब्बल ९१००० हजार विक्रमी मतांनी एकतर्फी विजय मिळवून इतिहास रचला आहे.
आक्टोबर महीण्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले होते .पुसद विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) गटाच्यावतीने श्री.इंद्रनिल नाईक यांना तर राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) गटाच्यावतीने श्री.शरद मैद यांना उमेदवारी जाहीर झाली होती.
पुसद हा १९५२ पासून बंजारा समाजाचा अभेद किल्ला,या किल्याचे नेर्तुत्व नाईक घराण्याने केले आहे.या घराण्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री,दोन राज्यपाल,दोन खासदार,चार मंत्री देऊन राज्याच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला आहे.वसंतराव नाईक यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी करत विकासाच्या बाबतीत देशांत अव्वलस्थानी नेले.
आज महाराष्ट्र जो प्रगती पथावर गेला आहे त्यात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे.वसंतराव नाईक यांनी आधूनिक महाराष्ट्राची उभारणीच केली नाही तर सामाजिक न्याय देण्याचे काम देखील केले.बि.डी.देशमुख समिती नेमून इंग्रजांनी जन्मजात गुन्हेगार ठरवलेल्या जातींना विमुक्त जाती भटक्या जमातींना शिक्षणात शिष्यवूत्ती ,नोकरीत पदोन्नतीत शिक्षणात आरक्षण आश्रमशाळा देऊन विकासाच्या प्रवाहात आणल्यानेतसेच ओबिसीना देशात सर्वप्रथम आरक्षण दिल्याने तथा १९७२-७३ मध्ये दुष्काळ निवारण करण्यसाठी घेतलेले अपार कष्ट व राजकारणात त्यांनी सुसंस्कूतपणा आणल्याने त्यांची एक आगळी वेगळी छबी निर्माण झाली होती.
वसंतराव नाईक यांच्या निधनानंतर सुधाकरराव नाईक यांनी शिक्षणमंत्री असतांना गावोगावी शाळा देऊन केलेला शिक्षणाचा प्रसार,राज्यात जलसंधारण खाते निर्माण करून राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न तसेच राज्यातील अंडरवर्ल्ड संपवण्याची घेतलेली भुमिका यामुळे सुधाकरराव नाईक यांच्या भोवती देखील एक वलय निर्माण झाले होते.
सुधाकरराव नाईक यांच्या नंतर बंधू मनोहरराव नाईक यांनी देखील विविध खात्याचे मंत्रीपद भुसवत गोर-गरीब गरजवंताना रूग्णानां मदतीचा हात दिल्याने त्यांची प्रतिमा दयावान नेते अशीच.
मनोहरराव नाईक यांच्या राजकीय संन्यासानंतर धाकटे पुत्र इंद्रनिल नाईक यांनी पाच वर्षे आमदारपदी राहून जनसेवा केली.
राज्यात २जूलै २३ रोजी राजकीय भूकंप झाला.राष्ट्रवादी काॅंग्रेस दोन गटात विभागली गेली.आमदार इंद्रनिल नाईक यांनी अजित पवार यांना साथ दिल्याने त्यांची भुमिका अनेकांना पचणी पडली नाही. अशातच लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले लोकसभेची निवडणुकही झाली.राज्यात लोकसभेत महायुतीची वाताहात झाल्याने विरोधकांच्या हाती चांगलेच कोलीत मिलाळाले ते बरळू लागले नाईक घरण्याचे नामोनिशान मिळवायचे आहे,त्यात बंजारा समाजातील महाभागाची संख्या कमी नव्हती बंजारा समाज काय नाईक घरण्याची खाजगी मालमत्ता आहे काय?
आक्टोबर महीण्यात विधानसभेचे बिगुल वाजले.इंद्रनिल नाईक यांचे प्रतिस्पर्धी बॅकेचे अनेक वर्षे अध्मक्ष राहील्याने आपसुकपणे पैसाही भरपुर असल्याने लोक सांगू लागले भकम पिसावाळो छ.मसनमान,बौध्द,आदीवासीर मत मळेनी जेती काई खरो छेनी.त्यामुळे मनात वाटायचे नाईक साहेब यांनी लावलेला दिवा वाझतो की काय? असे झाल्यास आतापर्यंत आम्ही लोकांना मोठ्या अभिमानाने सांगत होतो १९५२पासुन आमचा पुसदचा किल्ला अभेंद आहे,आता पराजय झाल्यास मोठी नामुष्कीला सामोरे जावे लागेल असे अनेक प्रश्नाचे मनात काहूर माजले होते.अश्यात निवडणुकीत विरोधीपक्षाने मोठा खर्च केल्याचे ऐकुण बैचन होतो.
२३ निकालाचा दिवस उजाळला सुरूवाती पासुनच इंद्रनिल नाईक प्रत्येक फेरीत आघाडी घेत असल्याचे पाहून सुटकेचा श्वास घेत होतो.राज्यात अनेक दिग्गजांच्या लढतीत काट्याची टक्कर होती.तर इंद्रनिल नाईक यांची मतांची आघाडी वाढतच ती ९१८३२ पर्यंत गेली आणी धनशक्ती विरुध्द जनशक्तीची लढाई इंद्रनिल नाईक जिंकणार यावर शिक्कामोर्तब झाले.


