अकोला विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
अकोला :- गुरूवारी होळी व शुक्रवारची धुलीवंदन मोठ्या आनंद उत्सव साजरी करण्यात आले शुक्रवारी मुस्लिम समाजाने नमाज शांततेत पार पडली आज देशभरात होळी साजरी करण्यात आली. याशिवाय रमजानच्या शुक्रवारची नमाजही अदा करण्यात आली. कोणताही गोंधळ किंवा गोंधळ होऊ नये म्हणून अकोल्यातील पोलीस प्रशासन सतर्क होते. संवेदनशील भागात फ्लॅग मार्च काढण्यात आला. बंधुभावाचा आदर्श कायम ठेवत अकोल्यातील नागरिकांनी होळीचा सण साजरा केला असून मुस्लिम समाजाने शुक्रवारी विशेष नमाज अदा केली.


