कैलासराजे घरत:-खारपाडा पेण प्रतिनीधी
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन व जे. एस. डब्ल्यू, फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण व अलिबाग तालुक्यातील २६ शाळामध्ये जे. एस. डब्लू, अस्यायर प्रकल्प राबविला जातो, या प्रकल्प अंतर्गत 1600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जीवनकौशल्य तथा भाषाज्ञान, अंकज्ञान याच प्रशिक्षण दिलं जात सोबत विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यावेळी प्रकल्पाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर संदेश देण्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये वर्तन व्यवस्थापन प्रणालीचे भित्तीचित्र काढण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक शाळा रोडे, प्राथमिक व माध्यमिक शाळा कोप्रोली, प्राथमिक व माध्यमिक शाळा कणे, प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल सोनखार आणि दादर येथील शाळांमध्ये ही भित्तीचित्रे काढण्यात आली.

आदर्श व गुणी विद्यार्थी तसेच सुजाण नागरिक कसा असावा? याचा बोध हे चित्र पाहिल्यावर होते. अशा या भित्तीचित्राच्या उद्घाटन सोहळ्यास जे. एस.डब्ल्यू. सी.एस.आर. इन्चार्ज कुणाल तडस, एक्झक्युटिव्ह किरण म्हात्रे, क्लस्टर मॅनेजर प्रगती पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सहशिक्षक, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वॉल पेंटिंगच्या उद्घाटनाची सर्व जबाबदारी शाळेच्या बालपंचायत मधील विद्यार्थी पदाधिकारी यांनी घेतली होती. मॅजिक बसचे सर्व एज्युकेटर यांच्या सहकार्याने व प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रगती पाटील यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्पाच्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन, स्थानिक लोकप्रतिनिधी व पालक वर्गाकडून फार कौतुक केलं जात आहे.

