भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
मोहाडी-: वृद्धांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम डीबीडीचे नावाखाली थांबवू नका अशी मागणी मोहाडी तालुका काँग्रेस पक्षाने केली आहे. अशा आशाचे निवेदन असेल तर मोहाडी तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले..
निराधार लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे.. डीबीटी द्वारे अनुदान मिळणार या नावाखाली आधी गावागावात ग्राम महसूल अधिकाऱ्यातर्फे निराधारंकडून शिधापत्रिका , बँक पासबुक, आधार कार्ड, व वयाच्या पुरावा आदी कागद पत्रे मागण्यात आली.

या शिष्टमंडळात नरेश भाऊ ईश्वरकर (जिल्हा परिषद सभापती भंडारा) , देवा इलमे(जिल्हा परिषद सदस्य), गजानन झंजाड(जिल्हा महासचिव भंडारा जिल्हा), राजेश हटवार(तालुकाध्यक्ष मोहाडी), विजय शहारे(शहर अध्यक्ष मोहाडी) शशिकांत नागफासे, केशव भाऊ शेंडे, रंजित सेलोकर, गुड्डू बांते, रामदास खडसे, हिराचंद वरखडे, भाऊराव डहाळे, पराग आगाशे व आदी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


