अकोला विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
अकोला येथे गत आठ वर्षापासून श्री नितीन गवारे सर राहणार न्यू खेतान नगर, कौलखेड, अकोला. यांच्याकडून एक आगळावेगळा रंगपंचमी चा उपक्रम राबविण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक रंगांनी त्यांच्या आवडीच्या कार्टून चे चित्र काढून व आपल्या आप्पानां रंग लावून त्याच प्रकारे त्यांचे आशीर्वाद घेऊन मुलांनी रंगपंचमी साजरी केली.यामागे त्यांचे विचार असे आहे की मुलांना आपल्या कुटुंबीयांसोबत व आप्पांसोबत रंगपंचमी साजरी करता यावी. त्यांचे आशीर्वाद मिळावे व नवीन पिढीला भारतीय सण नैसर्गिक व आदरयुक्त कसे साजरे करावे याची प्रेरणा मिळावी. यांच्या बद्दल आदर व्यक्त व्हावा.

समाजा त नवीन प्रथा निर्माण व्हावी. समाजात निसर्गाचा समतोल साधून कसे सण साजरे करावे. याबद्दल जनजागृती व्हावी. यामुळे मुलं कुटुंबात सोबत राहतात व आजच्या काळातील केमिकल युक्त सण साजरी करण्याच्या दूर राहू शकतात. प्रत्येकाने असेच नाविन्यपूर्ण व नैसर्गिक रित्या रंगपंचमी साजरी करावी असे आव्हान करतात. यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा व तसेच देवलसी कुटुंबीयांचा सहभाग लाभला. निसर्गप्रेमी कलाशिक्षक नितीन नंदकिशोर गवारे सर म्हणाले.

